मजरा रै येथे ७५ वा संविधान अमृत महोत्सव दिवस मोठ्या थाटात साजरा

वेळ पडल्यास संविधान रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शेरकुरे

दरवर्षीप्रमाणे यंदाही 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा वरोरा तालुक्यातील मजरा रै येथे 75 वा अमृत महोत्सव संविधान दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मजरा रै चे सरपंच राकेश बोढे उपस्थित होते उद्घाटक म्हणून वरोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांची उपस्थिती होती,प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या कवीश मेश्राम, शिक्षिका निर्मला देशकर ,बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष लोमेश सातपुते ,पोलीस पाटील साधना दिवे, सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शेरकुरे व ग्रा पं माजी सदस्य आनंद ढोके ,यांची उपस्थिती होती सर्वप्रथम घटणेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सकाळी गावात प्रभात फेरी काढून संविधान जागृती बाबत जय भीम व जय संविधानच्या घोषणा देण्यात आल्या बौद्धविहार येथे बुद्ध वंदना देण्यात आली व सायंकाळी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यात कवीश मेश्राम म्हणाल्या शाळेत व आपल्या घरात मुलांना दररोज संविधान शिकविले पाहिजे यामुळे पुढील भविष्यात मुलांना आपल्या कायदा हक्क व अधिकाराची जाणीव निर्माण होईल असे मेश्राम म्हणाल्या,अहेतेशाम अली म्हणाले सध्याचे राजकारणी हे जातीपाती मध्ये भांडण लावण्याचे काम करत आहे संविधानाने हिंदू मुस्लिम शिख ,ईसाई तसेच इतर धर्म जातीला एकसंघ करण्याचे काम केले बाबासाहेबांच्या संविधानामुळे दिन दलित अल्पसंख्यांक आदिवासी व इतर समाज आज सुरक्षित असल्याचे ते म्हणाले मी कोणत्याही सामाजिक कामासाठी मागे पडणार नाही व मजरा गावासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे म्हणाले धर्मेंद्र शेरकुरे म्हणाले सध्या देशात सरकार संविधानात बदल करणार असल्याच्या जनमाणसात अफवा पसरवत आहे असे झाल्यास आपणा सर्वांना संविधान रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे धर्मेंद्र शेरकुरे म्हणाले त्यानंतर अनेक प्रमुख पाहुण्यांची समायोजित भाषणे झाली नंतर सविधान जागृती बाबत बौद्ध व भीम गीताचा कव्वाली चा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध पंच कमिटी मजरा रै,सावित्रीबाई फुले महिला मंडळ व समस्त बौद्ध समाज व ग्रामवासी यांनी सहकार्य केले यामध्ये लोमेश सातपुते ,लखन गडेकर, राहुल धोपटे, राजू तामगाडगे ,पंकज भगत, छायाबाई धोटे, उर्मिला भगत, यांनीही मोलाचे योगदान दिले व गावातील स्थानिक नागरिकांनीची मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती होती.