रावेरीतील सीता मंदिरात शरद जोशी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे असलेल्या देशातील एकमेव सीता मंदिरात १२ डिसेंबर २०२४ रोजी आदरणीय शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात संघटनेच्या पुढील वाटचालीसंबंधी चर्चा होणार असून शेतकरी संघटनेशी संबंधित सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चर्चेनंतर पवित्र रामगंगा नदीची परिक्रमा आयोजित केली असून तिचे एकूण अंतर सुमारे १८ किलोमीटर असेल. परिक्रमेच्या समारोपानंतर रावेरी येथे सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमासाठी स्थानिक आमदारांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. शरद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रावेरी येथे स्मारक उभारणीबाबतही चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे शरद जोशी यांच्या विचारांची आठवण ठेवत, शेतकरी चळवळीला बळकटी देण्याचा उद्देश आहे. कार्यक्रम संयोजक
बाळासाहेब देशमुख, रावेरी. यांचे आव्हान सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि इच्छुक व्यक्तींनी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.