
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भरधाव कंटेनरने ट्रकला मागाहून धडक दिल्याने या अपघातात कंटेनर चालक गंभीर गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.१७) डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील वडकी येथील सैनिक धाब्यासमोर घडली.
कानपूर वरून हेंद्राबादच्या दिशेने प्लाष्टीक घेऊन जाणाऱ्या ट्रक क्र यु,पी ७८ डी,टी २४६७ ला भरधाव येणाऱ्या कंटेनर क्र एच आर ५५ ए आर 4914 ने येथील नॅशनल हायवे क्र ४४ वरील सैनिक धाब्यासमोर मागाहून जोराची धडक दिली.या अपघातात कंटेनर चालक साहिल खान वय २५ वर्ष रा.मेवात (हरियाणा) याचे दोन्ही पाय कॅबिन मध्ये फसले होते तेव्हा घटनास्थळावर वडकी पोलीस व एन एच आयच्या कर्मचाऱ्यांनी लगेच धाव घेत कॅबिन मध्ये फसून असलेल्या कंटेनर चालकाला मोठ्या शिताफीतीने बाहेर काढले.यावेळी चालक साहिलखान याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आहे.यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांचे मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.
