राळेगांव पंचायत समितीत पेसा दिन साजरा

शासनाने पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम १९९६ पेसा कायदा अस्तित्वात आनला असून या पेसा कायद्याला २४ डिसेंबर २०२४ रोजी २८ वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने, पंचायत राज मंत्रालयाने २४ डिसेंबर हा दिवस पेसा दिवस म्हणुन साजरा करण्याबाबत निर्देशित केले होते. त्यानुसार राळेगांव पंचायत समिती येथे दिं २४ डिसेंबर २०२४ रोज सोमवारला पेसा दिन साजरा करण्यात आला.
पेसा दिना निमित्य तालुका व्यवस्थापक कुं सविता काटवटे यांनी पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांशी संबंधित असून आदिवासींची संस्कृती प्रथा परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आहे या आदी विषयी कायद्याचे वाचन केले यावेळी उपस्थित पंचायत समितीचे गट विकास अधिकरी केशव पवार सहगट गटविकास अधिकारी श्रीमती भारती इशाळ विस्तार अधिकारी दिपक मस्के, राहुल वंजारी, कू, सारिका बनकर, उईके,मनोज कडू, लहू वानखेडे, सोनल कुडमथे, उमेश शंभरकर. जिल्हा व्यवस्थापक पेसा आशिष विणकरे आदी उपस्थित होते