
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दिनांक 24/12/2024 रोजी यवतमाळ- आर्णी मार्गावर सायंकाळी 6 वाजता श्री दिगंबरराव कोंडावार वय 70 वर्षें नेहमी प्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर गेले असता अमृत गार्डन जवळ आर्णी कडुन येणाऱ्या लाल रंगाच्या दुचाकी स्वाराने धडक दिली व पळून गेला,तिथे बघ्याची गर्दी जमली पण कोणीही मदतीचा हात दिला नाही तेवढ्यात शाळा संपुन यवतमाळ कडे परत येत असताना श्री किशोर बनारसे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक,सुरज राठोड व श्रीकृष्ण मोहरकर यांना गर्दी दिसली व त्यांच्या लक्षात आले की अपघात झाला आहे,त्यांनी तातडीने आटो चालकाला बोलावून अपघात व्यक्तिला जिल्हा रुग्णालय मध्ये भरती केले व त्यांच्या नातेवाईकांना सुचित केले .
त्याच्या या कार्याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे… जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पंचभाई,राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री अविनाश जी रोकडे व प्राचार्य राजेश शर्मा यांनी त्यांचे अभिनंदन केले.
