ढाणकी बिटरगाव (बु)रस्ता खड्डेमय विद्यार्थ्यांचे गरोदर माताचे बेहाल निवडणुकीच्या ओघात आश्वासन देणारे नेते मंडळी ठरले


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी.


देशाला स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्षे झाली देश हा विकसनशील ते कडून विकसित होणार अशा वल्गना राजकारणी नियमितपणे सांगतात पण ते केवळ कागदावरच राहतो की काय असा प्रश्न सध्या पडतो आहे. विकसनशील व विकसित हा मुद्दा यामुळे उपस्थित होतो की बिटरगाव (बू)ते ढाणकी रस्त्याचे काम गेल्या केले अनेक दिवसांपासून चालू आहे कधी ठेकेदारावर निकृष्ट दर्जाच्या किवा वेळ लागत अशा प्रकारची कार्यवाही झालेली बघायला मिळाली नाही. फोटोमध्ये दिसणारा रोड नक्षलग्रस्त भामरागड ते येटापल्ली येथील नसून उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील गाव खेड्याला जोडणारा आहे पण अशा पद्धतीने या रोडची दैना अवस्था बनली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अशा निवडणुका सातत्याने या बंदी विभागात होत असताना सत्ताधारी व विरोधक असलेल्या नेत्यांनी या भागात प्रामुख्याने प्रचारासाठी आले असताना त्यांना ह्या बाबी निदर्शनास येऊ नये?? त्याकडे केवळ “दुर्लक्षम” एवढेच करायचे असा त्यांचा हेतू राहिलेला दिसतो. बिटरगाव(बु)येथे पोलिस ठाणे असल्यामुळे अनेकांना तक्रारी देण्याकरता याच रस्त्यावरून जावे लागते व एखाद्या वेळेस अनुचित घटना घडली असल्यास पोलिसाचा ताफा वाहनाने येथूनच येजा करतो त्यामुळे त्यांना सुद्धा येथे अडचण निर्माण होत आहे.
दळणवळणाची उत्तम व्यवस्था राहील्यास देशाची राज्याची व समाजाची प्रगती होते. काही दिवसापूर्वी मण्याळी येथील गरोदर असलेल्या माता भगिनींचा वाटेतच उपचारा अभावी मृत्यू झाला व त्या कुटुंबाची न भरून निघणारी हानी झाली. नेहमीप्रमाणे राजकारणी लोकांनी घटनेबद्दल केल्या संवेदना व्यक्त केल्या पण आणखी सुद्धा हा रस्ता सुस्थितीत व्हायला नेमका किती वेळ लागणार हा येणार काळच ठरवेल. ठरलेल्या कालावधीपेक्षा वेळ लागला तरी कंत्राटदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई सगळीकडेच प्रशासन करेल याबाबत कायमच साशंकता राहिली. बिटरगाव(बू ) बंदी भागातील सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची खरेदी करायचे असल्यास ढाणकी किंवा उमरखेड इथे जावे लागते. रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे वेळ पैसा व आरोग्याची हानी होत आहे राजकारणी व त्यातील चर्चेत राहत असलेले त्यांचे सवंगडी मात्र यावर “ब्र” शब्द काढायला तयार नाही त्यामुळे सर्वसामान्यांनी केलेल्या मतदानाची किंमत कशी व किती केली हे निदर्शनास येते. या खराब रस्त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहने काही दिवसात भंगार झाली अपघाताचे प्रमाण वाढले आरोग्य सेवेची बेहाल होत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्याचा सध्या रब्बी हंगामाचा मौसम आहे त्यासाठी कीटकनाशके खत खरेदी करण्याकरता नियमितपणे गाव खेड्यातील लोकांना ढाणकी येथे यावे लागते अनेक कारखान्याच्या टोळ्या जिकडे तिकडे ऊस तोडण्याची साठी येतात पण बिटरगाव (बु) परिसरातील तो गुडघ्या एवढ्या खड्ड्यांचा रस्ता बघितल्यानंतर मात्र एकही ट्रॅक्टर चालक आपले वाहन व टोळी टाकायला तयार नाही कृषीप्रधान असलेल्या देशात अशा पद्धतीने हेटाळणी होत आहे. जनसामान्य आता निवेदन देऊन वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित करून थकले असून येणाऱ्या काळामध्ये याचे मोठे जन आंदोलन उभे ठाकून आगडोंब उठल्याशिवाय राहणार नाही.