राळेगाव येथे भव्य श्री मद भागवत कथा सप्ताहाची सांगता [ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान]

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव नगरीं भागवत सप्ताह आयोजन समिती व साई सेवाश्रम,श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चे वतीने सलग दुसऱ्या वर्षी ज्ञानयज्ञ सोहळा 23ते 29 डिसें. दरम्यान उत्साह, आनंदात पार पडला. भव्य संगितमय श्रीमद भागवत कथा वृंदावनवासी प. पू. बालयोगी श्री गोपाल महाराज कारखेडकर यांच्या सुमधुर वाणीतून ऐकून भाविक मंत्रमुग्ध झाले. शेवटच्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वात आधी प. पू. गोपाळ महाराज कारखेडकर यांचा त्यांनी अंत्यत मधुर, भावस्पर्शी आध्यात्मिक उपदेश सप्ताहात केल्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.या वेळी तहसीलदार अमित भोईटे, गट विकास अधिकारी केशव पवार, मुख्याधिकारी गिरीश पारेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
या वेळी शाल, श्रीफळ व उत्कृष्ट सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा व स्तुत्य कार्य करणार्यांचा गौरव करण्यात आला .देशातील 40 युवा उद्योजकामध्ये 12 व्या क्रमांकावर झेप घेउन तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव देशात पोहचवणाऱ्या युवा उद्योजक हृषीकेश मेंडोले व त्यांचे वडील अनिलराव आई शोभाताई यांचा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आला. अनिल खडसे यांनी अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन उच्च पदावर आपले नाव कोरले त्यांचा देखील आयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोबतच स्वेताताई हर्षदजी छोरिया आय आर एस अंतर्गत रेल्वे कमिशनर पदाला गवसनी घालून नावलौकिक प्राप्त करणाऱ्या व्यक्तिमत्व चा व त्यांचे पती ऍड. हर्षदजी छोरीया यांचा देखील सन्मान करण्यात आला. माध्यम जगत व माणुसकीची भिंत या सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक, आध्यात्मिक व सेवा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांचा व अमोलजी मुडे यांचा देखील सन्मान करण्यात आला. प्रबोधन करणारे अनंत महाराज, उत्कृष्ट शिक्षक व यवतमाळ पतसंस्था अध्यक्ष महेश सोनेकर, ऍड. अल्पेश देशमुख, सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे स्वप्नील वटाणे,उत्कृष्ट संचलक निखिल राऊत यांचा देखील गौरव करण्यात आला.
या आध्यात्मिक पर्वणीचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला , मोठ्या संख्येने पुरुष, महिलां भगिनीं,युवक युवती सर्वांनी उपस्थित होत्या.गांधी ले आउट येथील महिलां, पुरुष, युवक यांनी मेहनत घेतली.29 डिसेंबर ला भागवत सप्ताहची महाप्रसाद व काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
गांधी ले आउट चे मैदानात 23 ते 29 डिसें.धर्म, संसार, आचरण यांची सांगड घालणारी ही आध्यात्मिक पर्वणी आनंददायी ठरली.आयोजन समितीच्या सर्व मंडळीनी विशेष परिश्रम घेतले.