
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रुपेश रेंघे – यांनी दिनांक 02/01/2025 ला सकाळी 11:30 वाजता उपोषण सुरु केले..दैनंदिन जाण्या येण्या-साठी रस्ता नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 23/02/1998 मध्ये सुद्धा रुपेश रेंघे यांचे वडीलाना रस्त्या संदर्भात परिवारा समावेत उपोषण करावे लागले होते त्यावेळी सुद्धा आश्वासन देऊन 5 फूट रस्ता मोकळा करून देण्याचे ठरविले होते पण जवळपास 26 वर्ष उलटून रेंघे कुटुंबाला न्याय मिळाल नाही.. मागील रस्त्याचे अतिक्रमण नं निघाल्यामुळे रुपेश रेंघे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत 21/05/2024 ला भूमीअभिलेख कार्यालय ला मोजणी संदर्भात फी भरून मोजणीचा अर्ज दिला भूमी अभिलेख यांनी मा.ए एन देशमुख साहेब यांच्या अंतर्गत दिनांक 27/05/2024 ला पुन्हा एखदा जागेची मोजणी केली.यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व उपस्थित होते या मोजणीद्वारे त्यांनी 15:00 चौ. मी. चे अतिक्रमण असल्याचे प्रत क वर उल्लेख केला आहे.. त्यानंतर ग्रामपंचायत ने सुद्धा अतिक्रमण काढण्या संदर्भात तीन नोटीस पाठवून अतिक्रमण धारक व्यक्तीला सूचना केली पण मोजणी करून आजही 5 महिने उलटून रुपेश रेंघे यांना न्याय मिळाला नाही.. केवळ ग्रामपंचायत मतदान,समंध या आधारावर हे अतिक्रमण लांबवत असल्याचे मत रुपेश रेंघे यांच्या मुलाखती मधून दिसून आलेत.
ग्रामसेवक मडावी साहेब यांनी सुद्धा या प्रकरणासंदर्भात कुठलीही प्रकिया पार पाडली नाही.. अधिकारी म्हणून सरकारी अतिक्रमण काढण्याचे अधिकार असताना सुद्धा कुठलेही पाऊल उचले नाही…उपोषणा मध्ये 1) अतिक्रमण रस्ता मोकळा करावा 2) नझुल ने दिलेल्या प्रमाणे ग्रामपंचायत मालकीच्या रजिस्टर ला नोंद करने 3) अतिक्रमणधारक व्यक्तीवर कार्यवाही करने इत्यादी कारणाला घेऊन
रस्ता मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्धार उपोषणकर्ते रुपेश रेंघे यांनी व्यक्त केला.
