
सहसंपादक : रामभाऊ भोयर
खैरी , वडकी, सावंगी, कोसारा परीसरात अवैध रेती वाहतुकीचा धुमाकुळ पाठबळ नेमके कुणाचे? मारेगाव, राळेगाव महसुल विभागाची बघ्याची भूमिका का? मारेगाव, तालुक्यातील सावंगी,कोसारा तसेच राळेगाव तालुक्यातील कोच्ची येथील वर्धा नदिपात्रातुन रोज सायंकाळी ७ वाजल्यापासून नंतर तर पहाटे ५ वाजेपर्यंत सर्रासपणे अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ सुरू आहे हे रेती तस्करी करणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तर काही ठिकाणी तर लेखनिच्या नावावर पण अवैध धंदे तसेच टॅक्टर , टिप्पर व मोठ्या मोठ्या वाहनाने अवैध रेती तस्करी करीत असल्याचे दिसुन येत आहे . त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयाच्या महसूलची खुलेआम चोरी होत आहे त्यामुळे रेती तस्कर गब्बर बनल्या जात आहे . मात्र राळेगाव, व मारेगाव महसुली प्रशासनाला दिसत असुन मग राळेगाव,मारेगाव महसुल विभाग विभाग बघ्याची भूमिका घेण्याचे नेमके कारण काय ? आतातरी याकडे जिल्हधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून अवैध होत असलेली रेती तस्करांच्या मुसक्या आवळुन कठोर कारवाई करावी.तसेच खैरी , वडकी, सावंगी, कोसारा सांवगी,या ठिकाणी पथक सुरू करुन अवैध रेती तस्करी थांबवितील काय ? रेतीची असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे होतांना दिसुन येत आहे.
