
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या 18 तारखेला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला दिनांक 18/1/2025 रोजी ठीक 11.30 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नामदार अशोकराव उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय करण देवतळे आमदार भद्रावती विधानसभा हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे सचिव रोशन कोल्हे संचालक तथा माजी अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे संचालक शेखर झाडे, सुरेश गंधेवार, भरत पाल, दिलीप देशपांडे, गुलाबराव महाजन, श्रीमती सरोजनीबाई कोल्हे, सौ स्वप्ना आशिष कोल्हे,सौ.निशिगंधाताई रोशन कोल्हे हे उपस्थित राहणार आहेत.दिनांक 19/1/2025 रोजी रविवारी तालुका स्तरीय समुह नृत्य स्पर्धा ठीक 11.30 वाजता सुरू होणार असून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.प्रदीप गोडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग,मा. डॉ शिवानंद गुंडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग,मा.राजू काकडे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव हे राहणार असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे हे राहणार असून प्रमुख उपस्थिती संस्थेचे सर्व पदाधिकारी व झाडगावचे सरपंच रामदास किन्हाके, पोलिस पाटील प्रशांत वाणी हे राहणार असून या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 10,000 रूपये रोख स्व.अनंतराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अध्यक्ष दिलीप कोल्हे यांच्या कडून तर द्वितीय पारितोषिक 8000 रूपये स्व.लखुजी वाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रशांत वाणी व चंदाताई मोहन आत्राम सरपंच झरगड यांच्या कडून, तृतीय पारितोषिक 6000 रूपये रोख राजश्री शुभम मुके संचालिका श्री कोचिंग क्लासेस व अनिल पिंपरे यांच्या कडून चतुर्थ पारितोषिक 5000 रूपये रोख निखिल राऊत संचालक सुर्योदय कोचिंग क्लासेस तर पाचवे पारितोषिक 3000 रूपये रोख दिपाली राजेश भोयर श्री फ्रेश क्रिम केक शाॅप यांच्या कडून तर प्रोत्साहनपर पारितोषिक 2000 रूपये रोख सौ.गिताताई दिनेश गोहणे सरपंच सरई यांच्या कडून राहणार असून नृत्य स्पर्धा नियम व अटी नुसार घेतल्या जाणार आहे तर दिनांक 20/1/2025 रोज सोमवारला तालुका स्तरावरील सतरा वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.घनशाम राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ जिल्हा हे राहणार असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक तथा माजी अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. रामदास किन्हाके सरपंच झाडगाव व पोलीस पाटील प्रशांत वाणी झाडगाव यांची राहणार आहे तर या खेळात मुलांच्या कब्बडी स्पर्धेत प्रथम पारितोषिक 10000 रूपये रोख स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आशिष कोल्हे व संचालक शेखर झाडे यांच्या कडून द्वितीय पारितोषिक 7000रूपये रोख निलेश मिटकर,मिटकर कॅटर्स व डेकोरेशन व नितीन झाडे ग्राम पंचायत सदस्य भांब तर तृतीय पारितोषिक 5000 रूपये रोख दिपक नंदुरकर जय भवानी स्विटमार्ट सेंटर यांच्या कडून तर मुलीच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 10000 रोख रामदास किन्हाके सरपंच झाडगाव द्वितीय पारितोषिक 7000 रूपये रोख प्रविण झोटींग मंगलमूर्ती इलेक्ट्रॉनिक राळेगाव व प्रफुल्ल कोल्हे कुशल टाईल्स यांच्या कडून तर तृतीय पारितोषिक 5000 रूपये रोख संदीप तेलंगे संचालक खरेदी विक्री संघ राळेगाव व रूपेश बोरकुटे विराज बुट हाऊस यांच्या कडून तर मुला मुलींच्या अंतिम सामन्यात प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या संघांला प्रत्येकी एक हजार रुपये रोख लखाजी महाराज विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक व खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांच्या कडून देण्यात येणार आहे. कब्बडी खेळाचे अंपायर म्हणून नामवंत खेळाडू रफिक शेख, गजानन नाकाडे, सुयोग ठाकरे व राजू भटे हे राहणार असून खेळ अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनच्या नियमानुसार खेळवले जाणार असून खेळाडूची जन्मतारीख 1/1/2008 च्या नंतरची असलेला खेळाडू पात्र ठरेल अशी माहिती विद्यालयाकडून देण्यात आली.
