
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला दिनांक 18/1/2025 रोजी सुरुवात झाली याच कार्यक्रमातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक मा. चित्तरंजनदादा कोल्हे संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे सचिव रोशन कोल्हे, संचालक शेखर झाडे, सुरेश गंधेवार, दिलीप देशपांडे, गुलाबराव महाजन ,सौ.निशिगंधाताई रोशन कोल्हे, बाबाराव किन्नाके सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक विलास निमरड, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होती.
यामध्ये गावतील लखाजी महाराज कान्व्हेंट वं शाळेतील 5 ते 12 च्या सर्व विद्यार्थी विध्यार्थीनी यांनी वर्गनिहाय सामूहिक नृत्य सादर केले. उद्याच्या तालुकास्तरीय कार्यक्रमा करीता ज्या दात्यानी बक्षिसे दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात रामदासजीं किन्नाके, निखिल राऊत, प्रफुल कोल्हे, अनिल पिंपरे, नितीनभाऊ झाडें यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तकर्मचारी, विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
