
सहसंपादक : रामभाऊ भोयर
. राळेगाव येथे भोई समाज वधु -वर परीचय मेळावा आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात मोठे मोठे सत्ताधारी राजकीय पुढारी आमंत्रित होतें परंतु एका ही पुढाऱ्यांनी आपली तोंड दाखविण्याची हिम्मत केली नाही.हा सामाजिक आत्मक्लेश होता की काम याची शंका कार्यक्रमांत दिसून येत होती . प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करणारे मा.मधुसुदन कोवे गुरुजी उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.राजेद्रजी पारिसे उपस्थित होते भोई समाजातील सामाजिक कार्यकर्ते मा.वंदनाताई दाते, नंदु भाऊ पडाल एकनाथ राऊत ही सर्व सामाजिक कार्यकर्ता मंडळी मंचावर उपस्थित होती आणि मध्यंतरी मा.प्रा.वसंतराव पुरके साहेब यांनी हजेरी लावली होती . सामाजिक प्रबोधन आणि समाजाची सामाजिक, आणि राजकीय परिस्थिती काय आहे या विषयावर मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आणि सांगितले की समाजाचा विकास करायचा असेल तर समाजांनी राजकीय पक्षांच्या हमाल्या करण्यापेक्षा समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी एकत्र या आपल्या समाजाला न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता त्याला सत्तेवर बसवा आणि आपल्या सामाजिक समस्या आम्ही “‘ ग्राम स्वराज्य महामंच ” च्या माध्यमातून सरकार दरबारी पाठपुरावा करतं राहु असे कनखर मतं मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी भोई समाजातील वधुवर परीचय मेळावा या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन मा.मारोतराव पडाळ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य भोई समाज संघटना यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्र संचालन केले,समाज बांधवांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आणि सहभाग नोंदविला मा सातघरे साहेब,परसरामजी करलूके मा सुनिल पारीसे, अनंतराव पारीसे मा वाघाडे साहेब वंदना दाते सर्व भोई समाज बांधवांचे आभार मा वाघाडे साहेब यांनी मानले