
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भागवत सप्ताह आयोजित केलेला होता.दि.०९/०३/२०२५ ते १६/०३/२०२५ पर्यंत ह.भ.प संगिताताई कोरगावकर(शिर्डी) यांच्या सुमधुर वानीतून रामकथा ज्ञान सप्ताह आयोजित केला होता गावात पारंपरिकतेचा आधार घेत मंडळी रामकथा सप्ताहात सहभाग घेतात. त्यांच्या उत्साहाला चालना मिळावी, याकरिता तरुण मंडळीसुद्धा ज्येष्ठांच्या विनंतीला मान देत भागवत सप्ताह दरवर्षी पार पडतात.सातही दिवस शेतीचे कामे आटपून भागवत सप्ताहाला सहकार्य केले जाते. दैनंदिन भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात काकड आरती दररोज सकाळी ५ ते ७ या वेळेत काकड आरती भजन मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत होते.ह.भ.प संगिताताई कोपरगावकर(शिर्डी) यांच्या सुमधुर वाणीतून रामकथा सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या नियोजितपणे सुरू होते हरिपाठ सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत ग्रामवासी जनतेसह प्रवचनकार हरिपाठाची भूमिका सांभाळत होते.रात्री ९ ते १२ या वेळेत भारुड आणि किर्तनाचा आस्वाद गावातील मंडळीनी घेतला ह.भ.प संगिताताई कोपरगावकर यांच्या सोबतीला संगीत मंचात सहकार्याच्या भूमिकेत आर्गन गायक ह.भ.प दिनेश डोंगरे महाराज, तबला वादक ह.भ.प गजानन महाराज गवई,हरिपाठ व गायक ह.भ.प सुवर्णाताई गिरी,पॅडवादक राम महाराज आणि झाॅकीसजावट ह.भ.प मनिष महाराज वनोजा येथील संपूर्ण भजनी मंडळ सहभागी होते दि.१६-०३-२०२५ ला (तुकारामजीबिज) सकाळी ११ ते २ ह.भ.प विजय महाराज बागडिकर(आळंदीकर) गोपालकाल्याचे कीर्तन व दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली दिंडी सोहळ्यात खेड्यावरुन आलेल्या एकूण सात भजन मंडळाचा सहभाग होता तसेच गावातील भजन मंडळ ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ,जय बजरंग बली महीला भजन मंडळ,ओम शिवशक्ती भजन मंडळ, रामकृष्ण महीला भजन मंडळ, ओम साई पुरुष भजन मंडळ, दुर्गा माता महीला भजन मंडळ, निवृत्ती पुरुष भजन मंडळ, पालखी भजन मंडळ, काकड आरती भजन मंडळ यांचा सहभाग होता त्यानंतर सर्व भजनी मंडळांचा मान सन्मान केला तसेच सोहळा संपवून महाप्रसादाचे नियोजन केलेले होते
