
आज गुरुवार दिनांक ०३/०४/२०२५ पासुन श्री महाकाली माता चैत्र नवरात्रोत्सव यात्रेची सुरुवात झाली आहे.
आज गुरुवार दिनांक ०३/०४/२०२५ ला नवरात्रोत्सव ला प्रारंभ झाला परंपरे नुसार सकाळी चार वाजता धार्मिक विधीची सुरूवात झाली.प्रथम आई ला शेंदूर लावण्यात आले नंतर श्री महाकाली मातेच्या दुध, दही पंचामृत जल नि अभ्यंग स्नान करून देविला वस्त्र परिधान करण्यात आले, मातेच्या अंगावर अलंकार दागिने व मुखवटा चढवून हार फुले अर्पण करण्यात आले,
श्री महाकाली देवस्थान ट्रस्टचे चे व्यवस्थापक श्री सुनील नामदेवराव महाकाले व सौ क्षमा सुनील महाकाले यांच्या हस्ते घटस्थापना, करण्यात आली.देवीला पंचामृत अभिषेक करण्यात आला, नंतर महापुजा करण्यात आली व महाआरती नंतर मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले आई चा नामघोष करीत भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. परंपरे नुसार महाकाली मंदिर परिसरात हळद उधळण करीत डफ वाजत गाजत भाविकांनी हळदी ची उधळण करीत परिसर हळदीमय झाला व परंपरे नुसार श्री महाकाली मंदिरातुन भक्त मंडळी श्री एकवीरा मातेच्या घटस्थापना करिता वाजत गाजत हळदीचे उधळण करीत श्री महाकाली मातेची पालखी घेऊन मिरवणूक एकवीरा मंदिरा कडे निघाली मंदिर पोहचल्यावर श्री महाकाले परिवारातील सदस्य श्री ऋषिकेश अनिल महाकाले यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली व आरती नंतर मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले.
शनिवार दिनांक ०२/४/२०२५ ला श्री सुनील नामदेवराव महाकाले यांच्या हस्ते श्री प्रतिक महाराज व सहकारी यांच्या मंत्रोच्चारात मंत्र जागर करून देवता जाग्रुत करण्यासाठी पुजा विधी करण्यात आली व कळस पुजन करण्यात आले.
दिनांक ०३/०४/२०२५ ला अशा प्रकारे यात्रेची सुरुवात झाली. हनुमान पोर्णीमा हा सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याने ह्या दिवशी श्री महाकाली देविची महापुजा असते व दुपारच्या आरती नंतर घट हलविण्यात येतो व भाविक नारळ फोडून परतीचा मार्गाला लागतात व गर्दि कमी कमी होत जाते.
श्री महाकाली यात्रेत मराठवाडा, महाराष्ट्र राज्य सीमे जवळील आंध्र प्रदेश व ईतर जवळपास चा गावातून फार मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात.
भाविकांच्या निवासासाठी आंघोळीसाठी, देवस्थान व महानगर पालिकेच्या तर्फे सोय करण्यात आली आहे.
आरोग्यदायी २४ तास दवाखान्याची सोय करण्यात आली आहे मंदिर परिसरात स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात आली आहे मंदिराचे आवारात धर्मशाळा उपलब्ध आहे पिण्याच्या पाण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी मजबूत रेलिंग सह रांग व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेतील भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. मंदिराचे परिसरात, बैल बाजार मैदानावर, अंचलेश्वर मंदिर परिसर, व महाकाली मैदानावर निवासाची व्यवस्था वपाणपोई लावण्यात आली आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये व वातावरण थंड राखण्यासाठी आधुनिक फाॅगर सिस्टिम बसविण्यात आली आहे. दिनांक . हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी व महत्वाचे सुचना प्रसारित करण्या साठी ३० लाऊडस्पिकरच्या संच उपलब्ध करून देण्यात आला आहे.०६/०४/२०२५ रामनवमी पासून २४ तास महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी स्वच्छता दुताची, रांग व्यवस्थापन करिता व पाणी व्यवस्थापन करीता रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त १०० स्वयंम सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. फायर ऑडिट करण्यात आले आहे व अनुचित घटना घडू नये म्हणून जागोजागी C.C. TV Camera लावण्यात आले आहे.
गर्दी नियंत्रणासाठी पोलिस विभाग , व नैसर्गिक आपत्तीत सहाय्य करीता महानगरपालिका व शासनाला विनंती करण्यात आली आहे.
