
सहसंपादक : रामभाऊ भोयर
१० मे २०२४ रोजी वडकी येथील शेतकर्यानी शाखा व्यासास्थापक जि.म.स.कॉ. बैंक शाखा वडकी यांच्या मार्फत जिल्हा बँकेला निवेदन देण्यात आले. थेट कर्जवाटपाची अट शिथिल करण्यात आली. परंतु पुठे असे धोरण अवलंबिण्यात आले तर जा शेतकर्यांनी आज पर्यंत ग्राम विविध कार्यकारी सोसायटी चे मार्फत बँकेने कर्जवाटप करते वेळी सोसायटीने प्रत्येक सभासदाचे कर्जातून लाखो रुपय्याचे शेअर्स ची रक्कम सोसायटी मार्फत जमा करण्यात आली. त्याबाबत शेतकऱ्यांच्या शेअर्स ची रक्कमेचा कोणताही हिशेब शेतकर्यांना आज पर्यंत दिल्हेला नाही. त्या शेअर्स चा जमा झालेल्या रकमे वर बँक व्याजाचा मलिंदा खात आहे. त्याचा ना हिशोब ना माहिती शेतकर्यांना दिलेली नाही तरी शेतकर्यांना आपले नाव्याने आज पर्यत शेअर्सची माहिती झालेली नाही. त्याचे पूर्ण व्याजा सहित माहिती देऊन ती रक्कम शेतकर्याना परत करण्यात यावी. त्या रक्कमेचा शेतकर्याना आधार मिळू शकतो. त्या करिता आज पर्यंत जमा असलेला शेअर्स परत करण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे शेतकर्याना पीककर्ज वाटप करता त्याची माहिती नेहमी प्रसिद्ध करता त्याच प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील शाखे मार्फत आज पर्यंतचे आजी माजी संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक कार्यकर्ते यांना आज पर्यत किती कर्जवाटप करण्यात आले व किती वसूल करण्यात आलेले आहे याची सविस्तर माहिती जिल्हातील शेतकर्यांना व्हावी या दृष्टीने यवतमाळ जिल्हा मुख्य शाखेने माहिती प्रसिद्ध करावे तसेच किती सभासद थकीत आहे हे सुध्या प्रसिद्ध करावे. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ व बँकेला देण्यात आलेले आहे निवेदन देतांना खालील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यात श्री त्रैम्बक महाजन, डॉ अशोक फुटाणे, सोमेश्वर पिपराडे, कृषकुमार मोहता, राजेंद्र कोम्बे, अरुण फुटाणे, दिलीप बांगरे, सुभाष राऊत, गजानन डवरे, राजू देठे, गजानन देठे, दिगंबर हन्वान्ते इत्यादी शेतकरी प्रामुख्याने हजर होते.
