
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तिथी चैत्र शुद्ध नवमी रविवार दिं ६ एप्रिल २०२५ ते चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवार दिं.१२ एप्रिल २०२५ पर्यंत श्री हनुमान मंदिर व सीता माता मंदिर च्या प्रांगणात रावेरी येथे अखंड हरिनाम भागवत सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
तर सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम काकडा भजन सकाळी ५ ते ६ तर प्रवचन सकाळी ९ ते दुपारी १२ हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ नामसंकीर्तन सायंकाळी ९ ते ११ राहणार असून रविवार दिं. ६ एप्रिल २०२५ ला सकाळी ७:०० वाजता श्रीमद् भागवत कथाकार ह भ प श्री.हरी घरतकर शास्त्री आळंदीकर मु. सिलेपार, तालुका भिवापूर जिल्हा नागपूर यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय भागवत कथा
त्यानंतर हरिपाठ संच.
ह भ प कृष्णा उईके मृदंक वादक ह भ प गोविंदराव शिंदे झाकीकार,
ह भ प बाबा महाराज निर्मल विणेकरी
ह भ प गोपाल निर्मल तबलावादक
ह भ प पुरुषोत्तम खामनकर गायक आदीची साथ लाभणार आहे.
त्यानंतर दिं १२ एप्रिल २०२५ रोज शनिवार ला रावेरी ग्रामवासियाकडून महाप्रसाद तर दिं.१३ एप्रिल २०२५ ला धूळ विसर्जन कार्यक्रम रामगंगा नदीच्या पावन पात्रामध्ये होईल तरी या अखंड हरिनाम भागवत सप्ताहाला गावातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री हनुमान मंदिर व सीता माता मंदिर संस्थान रावेरी तथा सरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत रावेरी सर्व महिला पुरुष भजन मंडळी रावेरी समस्त ग्रामवकरी यांनी केले आहे
