नाते आपुलकीचे कडून कु.योगेश्वरी वाघमारे ला शिक्षणासाठी आर्थिक मदत


नाते आपुलकीचे बहुद्देशिय संस्था चंद्रपूर या संस्थेकडून बाबूपेठ येथील कु.योगेश्वरी शरदचंद्र वाघमारे ह्या मुलीला शैक्षणिक मदत म्हणून 10 हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य करण्यात आले.. योगेश्वरी ही सद्या पोस्ट बी. एस. सी. नर्सिंग प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असून तिचे वडील शरदचंद्र वाघमारे हे गॅसच्या शेगल्या दुरुस्तीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असली मुलगी हुशार आहे याची जाणीव कुटुंबीयांना असल्यामुळे त्यांनी तिला शिक्षणासाठी भरपूर प्रोत्साहन देत आहेत आणि संस्थेने घरची आर्थिक परिस्तिथी विचारात घेऊन संस्थेचे कोषाध्यक्ष इंजि.श्री.जयंतभाऊ देठे तसेच संस्थेचे सदस्य श्री.सचिन बावणे सर यांच्यामार्फत सदर मुलीच्या वडिलांना आज १० हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला… नाते आपुलकीचे बहुद्देशीय संस्था मागील 4 वर्षा पासून आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रात नेहमीच गरजूंना आर्थिक सहकार्य करीत असून चंद्रपूर जिल्हयातील अनेक गरजवंताना संस्थेने सेवाभाव जपत आर्थिक मदत केलेली आहे…