
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्रामीण भागातील नागरिकांचे पेन्शन खाते निराधार खाते आदी अनेक खातेदार या राष्ट्रीयकृत बँकेत आहे मात्र या बँकेत बँक व्यवहार करण्याचे फार्म हे हिंदी, इंग्रजी भाषेत असल्याने या बँकेला मराठी भाषेचे वावडे दिसून येत आहे.सर्व शासकीय कार्यालयात तसेच बँकेत दुकानात मराठी भाषेचा वापर करावा तसेच सर्व व्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावे असे असताना सुद्धा अजून पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत व्यवहार करण्याचे फार्म हे हिंदी इंग्रजी भाषेतच दिसून येत आहे.बँकेतील खातेधारक ग्राहक सामान्य असो श्रीमंत वा अथवा गरीब सर्वांसाठी
राष्ट्रीयीकृत बँका असून, स्थानिक भाषांमधून व्यवहार करणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेने हिंदी-इंग्रजीसोबत स्थानिक भाषेत व्यवहार करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. पण, सद्यातरी बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांना याचे वावडे असल्याचे दिसून आले. बँकांचेसर्व फलक, माहिती पत्रके ही हिंदी, इंग्रजी व प्रादेशिक भाषांमध्येहीअसावीत. बँकांची माहिती पुस्तकेही प्रादेशिक भाषांमध्ये असावीत. बँकिंगची सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकांचे कर्ज अर्ज, खाते उघडण्याचे अर्ज, बँकिंग व्यवहाराचे फॉर्म हे सर्व हिंदी, इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषांमधूनही असावेत, असा नियम आहे.
सरकारी नियम आणि बँकांची भूमिका
अनेक सरकारी आणि खासगी बँका आजही कामकाज आणि ग्राहक सेवांसाठी इंग्रजी आणि हिंदी भाषेचा अधिक वापर करतात. काही ठिकाणी मराठी भाषेचा वापर केवळ नाममात्र असतो. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्थानिक भाषेचा वापर करण्यासंबंधी नियम आहेत, पण त्यांची अंमलबजावणी पुरेशी होताना दिसत नाही.
मराठी भाषेचा राष्ट्रीयकृत बँकांना ग्रामीण भागातील असो व शहरी भागातील बँकेतील असलेले सर्वच खातेदाराना हिंदी किंवा इंग्रजीत लिहिता किंवा वाचता येत नाही त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत पैसे काढण्याचे किंवा भरण्याचा फार्म हा मराठीतच असायला हवा परंतु राष्ट्रीयीकृत बँक शाखांमध्ये मराठी भाषेचा खूप कमी वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. मोजक्याच ठिकाणी मराठी भाषेतील फलक असून, सर्व सूचनांचे बहुतांश ठिकाणी पालन होताना दिसले नाही. तर काहीच बँकांमध्ये पैसे भरणे व काढण्यासाठीच्या अर्जात मराठी भाषेचा पर्याय दिला तर बहुतांश बँकांना याचा विसर पडल्याचे पाहणीत दिसले.
