
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दि. 6/4/2025 ला रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली ,यावेळी प्रभू श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन वाढोणा (बाजार) बिट जमदार दिपक वाढरंसकर, प्रमोद ढाले, जितेंद्र कहुरके, प्रविण पन्नासे, संजय कारवटकर, गजानन सुरकर, सुहास मुडे, दीपक वरूडकर , अंकित कामडी, अंकित पाटिल व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले व संपुर्ण गावातून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची ट्रॅक्टर वर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ,रामनवमी ही गावागावात संपूर्ण भारत देशात उत्साहात साजरी करण्यात येते, प्रभू श्रीराम यांचे महत्व काय हे सर्वांना माहीत आहे. संत नामदेवाने प्रभू श्रीराम यांच्याबद्दल एक कविता लिहिली( उत्तम हा चैत्र मास ,ऋतू वसंताचा शुक्लपक्षी ही नववी ,उभे सुरवर व्योमी, माध्यन्हासी ये दिनकर, पळभरी होई स्थीर!
अशा या शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला राम आणि त्याचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभुत आहे ,राम आपल्या कुटुंबासाठी धर्मासाठी आणि देशासाठी लढला त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण गौरवतो आजही त्याचे गुण सर्वत्र भक्ती भवानी गायले जातात म्हणून संपूर्ण भारत देशात प्रभू श्रीराम यांचा जन्म मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी धानोरा येथील अनेक नागरिक हजर होते त्याचप्रमाणे वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुखदेव भोरखडे यांनी सुद्धा धानोरा येथील रामनवमीच्या मिरवणुकीला भेट दिली व सर्वा सोबत चर्चा केली यावेळी शिवशक्ती युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा या मंडळाच्या सर्व सदस्यानी या रामनवमीचा कार्यक्रमाच्ये आयोजन केले हे मात्र विशेष
