
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राळेगाव विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ राज साहेब ठाकरे यांची सभा झाली या सभेत ते 18 मिनिटे बोलले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे महाराष्ट्राच्या विकासाचा प्लॅन असल्यामुळे खरा विकास कशाला म्हणतो ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवून देईल म्हणून अशोक मेश्राम यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून देशात ओळख आहे या जिल्ह्याने दोन मुख्यमंत्री दिले तरीही या जिल्ह्यावर अशी पाळी का? आली हा विचार आपण सर्वांनी करायचा आहे .लाडक्या बहिणी योजनेचा त्यांनी चांगला समाचार घेतला कोणत्याही महिलांना मी फुकट काहीच देणार नाही त्यांना सक्षम बनविले त्यांच्या हाताला काम देईल असे फुकट वाटणे माझ्या विचारला पटणारे नाही असेही त्यांनी लाडके बहीण योजनेच्या बाबतीत विचार व्यक्त केले.या महाराष्ट्राला जाती जातीत वाटणारे एक संत आहे ते महान संत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार होय अशी टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली या संतापासून आपण सावध राहावे असेही त्यांनी म्हटले याप्रसंगी.व्यासपीठावर आनंद येमंबडवार देवा शिवरामपुरकर वर्षा मेश्राम मधुकर कोडापे शंकर वरघट सय्यद युसुफ अली इत्यादींची उपस्थिती होती सभेचे संचालन सय्यद युसुफ अली यांनी केले.
