
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मार्फत राबवल्या जाणाऱ्या “शासन आपल्या मोबाईलवर” या उपक्रमाअंतर्गत लोकांना माहिती देण्यासाठी विविध कायदे, शासन निर्णय, व न्यायनिर्णय यांचा आधार घेतलेला असून महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती दिनी सुरुवात करण्यात आली यात जमिनीची मोजणी, फेरफार, अकृषक परवानगी, दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद, शिधा पत्रिका, जमीन प्रकार, 7/12, वारसा नोंद, भूसंपादन, मतदार नोंदणी, कलम 155 दुरुस्ती, अतिक्रमण नियमित करणे, नैसर्गिक आपत्ती, जन्म मृत्यू नोंद, आदिवासी जमिनीचे व्यवहार, पोटखराबा जमीन वापरात आणणे, सामाजिक अर्थसहायय योजना, सहधारकांमध्ये हिस्से वाटप,गऊंनखनिज, अर्धन्यायिक प्रक्रिया, शेती घेताना घ्यावयाची दक्षता अशा विविध विषयांचा समावेश असून त्या बदल तज्ज्ञ शासकीय अधिकाऱ्यांमार्फत सोप्या भाषेत आपल्याला युट्युब माध्यमाद्वारे माहिती देण्यात येणार आहे.
आपल्या जिल्ह्यामध्ये महसूल खातेमार्फत आता एका नवीन उपक्रमाला सुरुवात करीत आहोत त्यामध्ये आपले शासनाचे सर्व अधिकारी जे आपले महसूल कायदाअंतर्गत आहे त्यांच्या मार्फत वेगवेगळे विषयांसंदर्भात लोकांसाठी माहिती देणार आहे त्या प्रकल्पामध्ये आपले जितके उपविभागीय अधिकारी आहे तहसीलदार आहे त्यांच्या मार्फत वेगवेगळे विषयाची निवड करून ते चांगल्या पद्धतीने आपण ते अपडेट करून सामान्य नागरिकांना समजेल अशा साध्या भाषेत तयार करून युट्युब वर टाकणार यात लोकांचे जिव्हाळ्याचे विषय आहे आणि त्यासाठी त्यांना तहसील कार्यालय व इतर कार्यालयामध्ये भेट द्यावे लागते फिरावे लागते, तलाठींची त्यांच्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी ते त्यांच्या संपर्क मध्ये राहतात. वेगवेगळ्या अडचणी या संदर्भात आपल्या जिल्हाप्रशासन कडून आपल्या मोबाईलवर आपण उपलब्ध करत आहोत. तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा मंडल अधिकार कार्यालयाला जे लोक भेट देतात त्यांच्या अडीअडचणी दूर होऊ शकतात त्या अनुषंगाने हे 23 विषय घेतले आहे. आज रोजी ची अपडेटेड माहिती आपण या व्हिडिओ मार्फत प्रत्येकाना उपलब्ध करून देत आहेत. आपल्याला जमीन कायद्याचे जे ज्ञान आहे ते खूप कमी लोकांपर्यंत सीमित न राहता आपल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे व अधिक माहिती मिळावी या साठी या उपक्रमाची सुरुवात केली
