
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी (दि. २६) रात्री उशिरा गोवंशाची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नाकाबंदी करून मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आयशर वाहनासह १२ बैल (गोवंश) ताब्यात घेतले असून, एकूण २२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नागपूरातील दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आबिद नूर कुरेशी (वय २६, रा. महेंद्र नगर, पाण्याची टाकी जवळ, नागपूर) आणि जगदीश भीमराव लिंगायत (वय ३७, रा. सेक्टर क्र. १७ ओले नगर, कोराडी, नागपूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपीकडून MH-40 CM-3230 क्रमांकाचे आयशर वाहन (किंमत सुमारे २० लाख रुपये) आणि त्यामधील १२ बैल (सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे) असा एकूण २२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
