
सहसंपादक: रामभाऊ भोयर
वंजारी फैल येथील नागरी आरोग्य केंन्द्राच्या नविन इमारत बांधकामाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार भावनाताई गवळी यांनी केली आहे. त्यांनी नुकतीच राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन त्यांचेकडे ही मागणी केली. आरोग्य मंत्र्यांनी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले असून परिसरातील नागरीकांची अडचण दूर होणार आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नगर परिषद क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 2 वंजारीफैल यवतमाळ येथे नवीन इमारत बांधकाम करिता सन 2021-22 या आर्थिक वर्ष मध्ये प्रस्थाव तयार करण्यात आलेला होता. सदर प्रस्थाव डिटेल प्रोजेक्ट रीपोर्टसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या, आय.डी. डब्लू. डिपार्टमेंट कडून मंजूर करून सहायक संचालक कार्यालय, अकोला यांची मंजुरी घेऊन डिटेल प्रोजेक्ट व इस्टीमेट तयार करून स्टेट ऑफिस मुंबई येथे मान्यतेस पाठविण्यात आलेला होता परंतु अद्यापही सदर आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरु झाले नाही. त्यामुळे माजी नगर सेवक तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी या संदर्भात सर्व माहिती भावनाताई गवळी यांना दिली. नागरीकांची मागणी लक्षात घेऊन भावनाताई गवळी यांनी नुकतीच मुंबई येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. या नागरी आरोग्य केन्द्राचा परिसरातील जवळपास 50 ते 60 हजार नागरीकांना फायदा होणार असल्यामुळे इमारतीकरीता निधीची मागणी केली. आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार लवकरच निधी प्राप्त होणार असल्याने नागरीकांनी सुध्दा समाधान व्यक्त केले आहे.
नागरीकांना होईल फायदा
नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून मी सदर इमारती करीता आवश्यक ठराव मंजूर करून घेतला आहे. नगर पालीका हद्दीतील जागेवर नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्या करीता नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. ही इमारत झाल्यास हजारो नागरीकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. पिंपळगाव, तलाव फैल, वंजारी फैल परिसरात मोठ्या प्रमाणात गरीब नागरीक वास्तव्य करीत असल्याने प्राधान्याने ही इमारत पुर्ण होणे गरजेचे आहे. त्याकरीता आम्ही आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून प्रयत्न करीता आहो. या इमारती करीता अंदाजीत निधी 78.22 लाख रुपये लवकरच प्राप्त होणार असून आम्ही या कामासाठी आग्रही आहो.
- पिंटु बांगर
शहर प्रमुख, शिवसेना यवतमाळ
