
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कु. संतोषी आगरकर हिला ऍडजेस्टेबल वॉश बेसिन च्या डिझाईन साठी पेटेंट कार्यालय, भारत सरकार चे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले. सदर डिझाईन ही दिव्यांग व्यक्तीसाठी असून त्याची संरचना कमी खर्चाची, कमी देखभाल, स्वदेशी बनावटी, पर्यावरणपूर्वक व सुरक्षित अशी आहे.
कु. संतोषी आगरकरि हिने दिव्यांग व्यक्तींना दररोज हाताची स्वच्छता राखताना येणाऱ्या अडचणीच चिकित्सिक अभ्यास व निरीक्षणातून ह्या वॉश बेसिन ची डिझाईन तयार केली आहे. ही डिझाईन समाजातील दिव्यांग व्यक्तीच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. यापूर्वी ही तिने महत्त्वाच्या विषयासंबंधी डिझाईन तयार केले असून भविष्यातही विविध सामाजिक समस्याचा अभ्यास करून त्यावर नवीन्यपूर्ण डिझाईन द्वारे उपाययोजना करण्याचा तिचा मानस आहे. ह्या यशाचे श्रेय तिने मार्गदर्शक अभियंता श्री. अजिंक्य कोत्तावर व ॲडव्होकेट सौ. कविता आगरकर यांना दिले.
कु. संतोषी ही इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगावचे माजी प्राचार्य डॉ. संतोष व्ही आगरकर यांची कन्या आहे. तिच्या या यशासाठी इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक करून तिला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
