
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तालुक्यातील येवती वडकी रोडवरील वनोजा येथील पुलाचे काम कासव गतीने चालू आहे,धानोरा,येवती,इतर गावाला जोडणारा हा परिसरातील हा एकमेव जास्त वर्दळीचा रस्ता आहे.ठेकेदाराने काम चालू असलेल्या धोकादायक बाजूने बॅरिगेट्स, साईड बांबू लावणे गरजेचे असताना, तसे कोणतेच सुरक्षेच्या दृष्टीने केलेले दिसत नाही. त्यामुळे रात्री मोठा अपघात होऊन दुर्घटना घडू शकते.येथील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पुलाशेजारून तयार केलेला बाह्यवळण रस्ता जोरदार मुसळधार पावसामुळे वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. येथील बाह्यवळण रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहून जाण्याची शक्यता आहे,रस्ता कडेलाच पुलाचे खोलवर साधारण १० ते १५ फूट खोल खड्डे आहेत,यात एखाद्याचा जीव गेला तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करत आहेत.पुलाला एक वर्ष आधी मंजुरी मिळाल्याने या वर्षाला मार्च एप्रिल ला पुलाच्या कामाला सुरुवात का झाली असा प्रश्न लोकांकडून बघावयास मिळत आहे,पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली आहे,पुलाचे बांधकाम कासव गतीने पहावयास मिळते.ठेकेदाराच्या मनमानी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे,या कामामुळे वाहनधारकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे संबंधित बांधकाम करणार्या ठेकेदारांने बाह्यवळण काढून त्या रोडवरती मुरूम टाकला आहे,त्या कच्च्या मुरमाटी आणि पाणी साचलेल्या रस्त्यामुळे कित्येक लोकांच्या गाड्या स्लीप होऊन पडत आहे.सदर पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.सदर कामाच्या ५०० मीटर अंतरापासून कुठलेही अंदाजपत्रक लावले नाही आहे,तेही या ठिकाणी लावणे गरजेचे आहे त्यामुळे बांधकाम साहित्याची गुणवत्ता आणि कामाची पद्धत याबद्दल अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे.यामुळे अनेक वाहनचालकांना दळणवळणाची मोठी अडचण निर्माण होत आहे.
त्यामुळे कामात दिरंगाई न करता ठेकेदाराने लवकरात लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आणि संबंधित विभागाने या पुलाचे काम लवकर करून लोकांना जाणण्यासाठी मार्ग खुला करून द्यावा अशी मागणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून आणि वनोजा ग्रामवासीयांकडून होतांना दिसून येत आहे.
