
प्रतिनिधी//शेख रमजान
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील संपूर्ण कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्री व आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन करण्यात आले होते . त्यानुसार येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार किसनराव वानखेडे यांच्या घरासमोर दि 11 एफ्रील रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यान आंदोलन केला .त्याप्रसंगी आमदार वानखेडे यांनी शेतकऱ्यांचा व दिव्यांगाचे प्रश्न येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले होते .
परंतु अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस ओलांडले असतानाही शेतकऱ्यांचा व दिव्यांगांचा प्रश्न आमदार वानखेडे यांनी अधिवेशनात मांडला नसल्याने संतप्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि 2 जुलै रोजी येथील स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून आमदार वानखेडे यांना दिलेल्या आश्वासनाची जाणीव करून दिली . .
पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून अद्यापही आमदार वानखेडे यांनी शेतकऱ्यांचा व दिव्यांगाचा प्रश्न उपस्थित न केल्याने आपण स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेऊ नये तसेच शेतकऱ्यांच्या , दिव्यांकांच्या प्रश्नांची मांडणी अधिवेशनात करू शकत नसाल तर आपण राजीनामा द्यावा असे स्पष्टवक्ती प्रहार चे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी केली .
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा उपजिल्हाप्रमुख अभिजीत गंधेवार, तालुकाप्रमुख सय्यद माजिद ,शहर सचिव श्याम चेके ,शहर प्रमुख राहुल मोहितवार, रघुनाथ खंडारे, दिव्यांग क्रांती आंदोलनाचे शहर प्रमुख प्रेम रुडे, सिद्धार्थ मुनेश्वर ,भास्कर गंजेवाड दिव्यांग तालुकाप्रमुख बालाजी माने यांची उपस्थिती होती
शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी बोलताना भाजपा युतीच्या सरकारने प्रचारात दरम्यान नागरिकांना मोठमोठे वचननामे व जाहीरनामे च्या माध्यमातून मत गोळा करून विजयी झाले परंतु दिलेला शब्द पाळला नसल्याने प्रहार जनशक्ती पक्ष हे आक्रमक होऊन विविध आंदोलने करीत आहेत त्यातच दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता च्या दरम्यान आमदार किसन वानखेडे यांच्या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांना कर्जमाफी व दिव्यांगांना 6000/- रुपये मानधन मिळावे याविषयी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आपण प्रश्न उपस्थित करावे असे सांगितले असता त्या क्षणी आमदार वानखेडे यांनी सदर आंदोलनाला संबोधित करताना नक्कीच शेतकरी व दिव्यांगांचा प्रश्न उपस्थित अधिवेशनात करेल असे आश्वासन दिले होते परंतु अधिवेशन सुरू होऊन तीन दिवस ओलांडले आहे त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किसन वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता वानखेडे यांनी एवढ्या मोठ्या अधिवेशनात मला बोलायला वेळ दिला नसल्याचे सांगितल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने आयोजित पत्रकार परिषदेतून आमदार वानखेडे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेऊ नये जर आपण अधिवेशनात शेतकऱ्यांचा विषय व दिव्यांकांचा विषय मांडू शकत नसाल तर आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावे असे ठोकपणे सांगितले ..
तसेच आमदार किसन वानखेडे यांच्यावर हल्लाबोल करीत
जर आपणास शेतकऱ्यांची व दिव्यांगांची तसेच मतदार संघातील जनतेची तळमळ असेल तर राजीनामा द्यावा असे आयोजित पत्रकार परिषदेतून सांगितले
तसेच या आंदोलनानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या निवासस्थानी पुसद येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर रक्तदान आंदोलन केले होते त्यातही त्यांच्याशी बोलताना आमचं रक्त सुद्धा घ्या पण आमच्या दिव्यांगांना मानधन द्या असे म्हणाले होते .
तसेच मोहितवार यांनी पुढे बोलताना आपण आदानी व अंबानी यांचं कर्जमाफी करण्यासाठी कोणती समितीची स्थापना करीत नाही परंतु शेतकरी व दिव्यांगासाठीच समितीची स्थापना करण्याची गरज का सरकारला पडते असही बोलले .
आमदार ,खासदारांना पगार वाढीची गरज नसतानाही पगार वाढ केली जाते परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासनाकडे अजिबात वेळ नसल्याचे ही सांगितले .
शेतकरी व दिव्यांगांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन :
महागाव तालुक्यातील अंबोडा येथे 14 जुलै रोजी शेतकरी ,दिव्यांग व बेरोजगारांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्या सभेसाठी उमरखेड महागाव विधानसभेतील सर्व शेतकरी ,दिव्यांग व बेरोजगार युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहान यावेळी प्रहार चे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी केले
