
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पोटगव्हान गावातल्या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली आणि शिक्षणाची जिद्द उराशी बाळगणारी कु भूमिका नरेश गायकवाड हिने आपल्या कर्तृत्वाने थेट ऑस्ट्रेलियापर्यंत झेप घेतली आहे. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून वडिलांने गाव सोडले आणि वर्धा गाठले तिचे प्राथमिक शिक्षण सेंट अल्फोनसा येथे झाले शालेय शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागला सतत तीन वर्ष शेतीत दुष्काळ झाल्याने शाळेची फी भरता न आल्याने शाळा व्यवस्थापनाने नोटीस दिली. त्याच वेळी शासनाने शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा शुल्क माफ करण्याविषयी आदेश काढला परंतु शेतकरी असल्याचा पुरावा शाळेला देणे अपेक्षित होते, तेव्हा पोटगव्हाण गावाचे सरपंच श्री संजय मोरे यांनी “देवाने पाठविला गरिबाचा माणूस” अशी ओळख असलेले श्री किशोर तिवारी यांची भेट घडवून आणली आणी किशोरभाऊ तिवारी यांनी शाळेच्या नावाने धनादेश दिला असे सतत तीन वर्ष त्यांनी आर्थिक मदत केली. त्याचे मोलाचे सहकार्य मिळाले म्हणून मी पुढे शिकू शकले .10 वी 12 वी झाल्यानंतर जेईई ही परीक्षा टॉप करून जे डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर येथे प्रवेश मिळवून आय टी शाखेत प्रविण्यासह उत्तीर्ण झाली. त्यानंतर कोणतीही शिकवणी न घेता यु ट्यूब वरील माहिती घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणारी आय एल टी एस परीक्षा पास करून सिडनी विद्यापीठात प्रवेश मिळवून नेशनल ओवरसिस स्कॉलरशिप अंतर्गत 1 करोड 60 लाख रुपयाची स्कॉलरशिप घेणारी जिल्ह्यातून पहिली ठरली .
तिच्या अथक मेहनतीच्या जोरावर ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात ती कॉमर्स एक्स्टेंशन अँड ग्लोबल लॉजिस्टिक या विषयावर संशोधन करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ती आपला आदर्श मानते. तसेंच श्री किशोर तिवारी पांढरकवडा व पोटगव्हाण चे सरपंच श्री संजय मोरे यांची मी सदैव ऋणी राहील. येणाऱ्या संकटावर रडत बसण्यापेक्षा संकटावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करता येऊ शकत अशी ती ठाम पणे सांगते.
तीच्या यशामागे तिचे पालक, शिक्षक आणी नालंदा अकॅडमी चे श्री कपिल वानखेडे, अनुप सर आणि स्वतःची जिद्द आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असताना तिने नेहमीच शैक्षणिक प्रावीण्य टिकवून ठेवले. तिच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र कौतुक होत आहे.
“गावातल्या मुलींनी ध्येय निश्चित करून जिद्दीने प्रयत्न केले, तर आकाश ही मर्यादा राहत नाही,” असे मत गावातील माजी सरपंच श्री संजय मोरे यांनी व्यक्त केले.
आज केवळ तिच्या कुटुंबाचीच नाही, तर संपूर्ण गावाची आणि जिल्ह्याची शान बनली आहे. तिच्या या प्रवासामुळे इतर ग्रामीण मुलींनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
