
गृहपाल आपल्या जबाबदारीतून मुक्त असल्याने त्यांच्या विषयी खासदार याना तहसील मार्फत विद्यार्थ्यांचे निवेदन सादर
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह राळेगाव येथे असून वस्तीगृहातील गृहपाल विद्यार्थ्यां विषयीची वर्तनुक हे योग्य करताना दिसत नाहीत त्याच्या पासून होत असलेला नाहकत्रास गृहपाल हे वस्तीगृहात हजर असतानी व इतर व्यसनाहीन पदार्थ खाऊन, पिऊन येतात – वस्तीगृहांत पूर्ण आठवडा न राहता फक्त तीन दिवस राहतात आणि नशे मध्ये असताना तेथील मुलांना खालच्या दर्जाच्या शिव्या देतात.दोन वर्षापासून हा प्रकार सतत चालू असल्याने संतप्त विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला विद्यार्थ्यांना नियमा नुसार पोषण आहार मिळत नाही तसेच प्यायला पुरेपुर पाणि सुद्धा मिळत नाही. गृहपाल हे पद नावापुरतेच का असा प्रश्न सध्या पालकास पडताना दिसून येत आहे,गृहपालाचे आपल्या जबाबदारीवर लक्ष नसल्याने या बाबीकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे असा सूर पा दिसून येत आहे, शासकीय वसतिगृह मधी गेल्या वर्षापासुन आलेल्या e-library पासुन आज रोजी विद्यार्थी वंचित आहे आलेल्या योजनेचा जर फायदा मुलांना होत नसेल तर पैसा गेला कुठे याकडे पण लक्ष केंद्रित करावे, विद्यार्थी गृहपल यांच्या त्रासामुळे आज रोजी निवेदन देण्यात आले.
