

सहसंपादक : रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर राळेगाव येथे रविवार, २७ जुलै रोजी आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व राजमाता जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विधिवत पूजनाने झाली. या पूजनास नगराध्यक्ष रवींद्र शेराम व उपनगराध्यक्ष जानराव गिरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पूजनानंतर “जय जिजाऊ, जय शिवराय” च्या गजरात शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक डॉ. संतोष कोकुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, अशोक पिंपरे, सुरेंद्र ताठे, राजू रोहनकर, राजेंद्र नागतुरे, नितीन कोमेरवार, संजय दुरबुडे, पद्माकर ठाकरे, प्रा. रंजय चौधरी, विवेक गवळी, अरविंद तामगाडगे, शंकर मोहरले, अमर ठाकरे, राहुल बहाळे, योगेश इंगोले, गोपाल भटकर, महेश कोडापे, रुपेश कोठारे, रोहित शिवणकर, नितीन कोरडे, भूपेंद्र चांदेकर, चेतन बेंबारे, प्रशिक भोंगाडे, प्रवीण काकडे, रोहित वर्मा, शिवराज कोकुलवार, शेखर आंबा, शुभम सिडाम, लोकेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सांगतेला सार्थक बहाळे यांच्या जोशपूर्ण शिवगर्जनाने वातावरणात देशभक्तीचा जागर निर्माण केला.
