
सहसंपादक : रामभाऊ भोयर
धानोरा येथील हर्षल गणेश फटींग (वय २५) यांनी दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथे पाठविण्यात आला. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास वडकी पोलिस करीत आहेत.
