
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिज्ञासा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ग्रंथालय दीपनगर यवतमाळ येथे सुरु करण्यात आले, ग्रंथालय उदघाटण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय लोहकरे, विदर्भ महाविद्याल्य अमरावती मराठी विभागाचे प्रमुख, फडकी मासिकाचे संपदक हॆ होते. उदघाटक म्हणून डॉ. अरविंद कुळमेथे, मेडिकल ऑफिसर तथा बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी रितसर ग्रंथाल्याचे उदघाटण करून, त्यांचे मार्गदर्शनात सांगितले, ग्रंथ माणसाचा मित्र असून त्यांचे संगतीने आपलें उद्देशाची पूर्ती पूर्ण करून विकासाच्या पायऱ्या चढता येतें. ग्रंथा वाचन करणे आवश्यक आहें. अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय लोहकरे म्हणाले, ज्या देशात जास्तीत जास्त ग्रंथाल्ये असतील तो देश प्रगतशील असतो, विश्वगुरु बनत असतो.कार्यक्रमाचे संचालन प्रा. वसंत कनाके यांनी केले, संदेश देतांना ते म्हणाले, वाचालं तरच वाचलं! प्रकाशाची वाट ग्रंथ दाखवीत असतें असे सांगितले. आभार डॉ. सतीश कोडापे यांनी म्हणाले, संदेशात सांगितले कीं, शिक्षण आंधळ्यांना डोळे देते म्हणून, वाचणे, बोलणे, लिहिणे आवश्यक आहें असे सांगितले, या प्रसंगी समाज सेविका जयश्री मडावी उपस्थित होत्या तसेच साहित्यिक राजू मडावी,रामचंद्र आत्राम,धनराज मेश्राम, दत्तात्रय गावंडे हजर होते, समाज कार्यकर्ते सुरज मरस्कोल्हे, नामदेवराव पेंदोर, विष्णू कोवे, राजूभाऊ चांदेकर, सृष्टी मेडिकल मनिष राऊत साहेब प्रमुख पाहुणे म्हणून होते. तारा कनाके,वैजयंती कनाके, नंदा आत्राम, प्रेरणा खत्री,आशा राजुरकर, यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले. कार्यक्रम अंति ‘भीमाल’ यांचा वाढदिवस साजरा करून केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
