सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या किन्ही (जवादे) फट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक पुरुष जातीचे एक नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिं.२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली असून याबाबत वडकी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किन्ही जवादे फाट्यासमोर असलेल्या रस्त्याच्या कडेला चार ते पाच महिन्यांचे नवजात अर्भक किन्ही गावातील नागरिकाच्या निदर्शनास आली असता या घटनेची माहिती येथील पोलीस पाटील यांनी वडकी पोलीस स्टेशनला दिली यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे ,
पीएसआय प्रकाश देशमुख, बिट जमादार अमोल चौधरी, आकाश कोदूसे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून तातडीने पंचनामा केला व नवजात अर्भकाला त्याब्यात घेतले असता ते मृत अवस्थेत होते पोलिसांनी नवजात अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय राळेगाव येथे पाठविला असून या घटनेतील अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला असून हे बाळ कोणाचे आहे आणि असे कोन निर्दयी आई बाबा आहे व ते कोणत्या गावातील असावे ज्यांनी पोटच्या गोळ्याला अस फेकून दिलं याचा आता वडकी पोलीस शोध घेत आहे.
असून पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार अमोल चौधरी हे करीत आहे
