
प्रतिनिधी …..परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील आरोग्य विभागाला लाभलेला अनमोल हिरा म्हणजे डॉ.प्रताप परभणकर यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने त्याची काळजी घेतली पाहिजे व यांवर काय उपाययोजना केल्या जातील याच्या शोधात सत्तत प्रयत्नशील असतात आज त्यांनी लहान मुलांना लसीकरण मोहीम हाती घेतली आणि जनतेला आव्हाण केले आपले सहकार्य म्हणजे कोरोणा मुक्त कार्य आहे असे यावेळी बोलत होते म्हणुन त्यांना ग्रामीण भागातील शिल्पकार म्हटले जाऊ लागले एका करंजी नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि एक सामान्य जीवन जगण्यासाठी काय आवश्यकता असते हे त्याना माहिती आहे म्हणून त्याचा कल ग्रामीण भागात जास्त असतो त्यामुळे हि मोहीम हाती घेतली आहे
सार्वजनीक आरोग्य विभागा मार्फत ग्रामीण भागात चालवले जाणारे शुन्य ते पाच वर्ष वयो गटातील बालकांचे लसीकरण केले जाते.
स्वतंत्र भारतात सार्वजनीक आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेले सर्वात मोठे व कौतुकास्पद कार्य आहे.
प्रत्येक दशकात सार्वजनीक आरोग्य व्यवस्था समोर एक आव्हान उभा करणारा एखांदा तरी विषाणूजन्य (व्हायरल) आजार असतो. जसे पोलिओ, एच.आय.व्ही आदी मोठी यादी आहे. (सध्याच्या दशकात नोवल करोना विषाणू आहे.)
ग्रामीण भागात या सर्व विषाणू सोबत लढा देण्याची ताकत कधिही खाजगी आरोग्य व्यवस्था कडे नव्हती व भविष्यात राहणार नाही. ( भांडवलदारांची दलाल सरकारे सार्वजनीक आरोग्य व्यवस्थाचे खाजगीकरण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.)
99% डॉक्टरांनी आयुष्यात कधीही न वापरलेले आपातकालीन (इमरजंशी) इंजेक्शन अड्रनालीन मागच्या वर्षी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सिस्टरनी (डॉक्टर उपस्थित नसताना) एका बालकास (लस दिल्यावर अडवर्स इव्हेंट झाल्यास देतात) दिले आहे.
सध्या महाराष्ट्र सर्वत्र ANM सिस्टर ग्रामीण सार्वजनीक आरोग्य व्यवस्थेत काम करत आहेत व सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण,गरोदर माता तपासणी आदी महत्त्वपूर्ण कामे फक्त त्यांच्या मुळे होत आहेत.
ANM शिक्षणा घेण्यासाठी नव्वदच्या दशकात सातवी, त्या पुढच्या दशकात दहावी व आता पर्यंत बारावी(आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स) ची पूर्व आट होती. मागच्या काही वर्षात ANM कोर्स बंद झाला आहे.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बालकांचे लसीकरण पोहचले आहे याचे सर्वात जास्त श्रेय या ANM सिस्टर व MPW याना जाते.
हे ANM सिस्टर व MPW गरीब कुटुंबातून आले आहेत व नोकरी करताना गरीब परिस्थितीची जाण ठेवतात.
आज ग्रामीण भागात असंसर्ग आजाराने (NCD-non communicable diseases) थैमान घातले आहे. या NCD आजारा सोबत लढायचे असेल तर बालकांच्या लसीकरणचा कार्यक्रम ज्या पद्धतीने चालतो तसा आराखडा तयार करावा लागेल.
मोठं-मोठे, तज्ञ किंवा हुशार व्यक्ती सार्वजनीक आरोग्य यंत्रणेला भेटले नाही तरी चालेल पण शहाणे लोक भेटणे गरजेचे आहे व हेच खरे नव्या भारताचे शिल्पकार असतील.
