राजुरा तालुक्यातील नीर्ली या गावात मागील दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा

गावात पूर्वीपासून पिण्याच्या पाण्यासंबंधी तुटवडा आहे. गावात एकच हॅन्डपम्प असून तो सुद्धा मागील दोन महिन्यापासून बंद आहे.

प्रशासनाच्या या भोंगड कारभाराला संतापून गावकऱ्यांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांना फोन करून समस्यांबाबत माहिती दिली असता, त्यांनी गावात भेट देऊन संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्याशी फोनवरून चर्चा केली. प्रशासनाकडून संबंधित समस्या आजच्या आज मार्गी लावू असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या प्रसंगी शिवसेना कडोलीचे शाखाप्रमुख महेश झाडे,नीर्लीचे शाखा प्रमुख सचिन धांडे, गावातील पोलीस पाटील धांडेजी, आणि समस्त गावकरी उपस्थित होते.