
चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची मुलगी डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. तर ही आत्महत्या नक्की कशी झाली यावर सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी इंजेक्शन मागवण्यात आले होते. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली. त्यांना ५ इंजेक्शन मागवले होते.
तसेच यासंदर्भातील व्हॉट्सअप चॅटिंगही उपलब्ध आहे. डॉ. शीतल आमटे यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. ते काही दिवसांपासून पिसाळल्यासारखे करत होते, त्यामुळे त्यांना देण्यासाठी ही इंजेक्शन्स त्यांनी मागवली होती. ‘अनेस्थेशिया’ श्रेणीतील ही इंजेक्शन्स असून मागवलेल्या 5 इंजेक्शन्सपैकी 1 शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आता या इंजेक्शनवर तपास केंद्रीत केला आहे.
सहसंपादक:प्रशांत बदकी
