बल्लारपूर शहरातील टिळक वार्ड नं.१६ येथील नविन रोड व नालीचे बांधकाम लवकर सुरु करा- मनसे

प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर

नगराध्यक्ष नगरपंचायत बल्लारपूर यांना सादर केले निवेदन…..

बल्लारपूर शहराचा विकास दिवसागणिक झपाट्याने होत असून याला मात्र कुठेतरी गालबोट लागल्याचे स्पष्ट दिसत आहे अजुनही जनतेच्या समस्यांचे डोंगर वाढत असून याकडे मात्र प्रशासणाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे बल्लारपूर शहरातील टिळक वार्ड नं.१६ येथील अपूर्ण नाली व ठिकठिकाणी पडलेले खड्डे येथील सामान्य माणसाला डोकेदुखी ठरत आहे हि गंभीर बाब लक्षात घेऊन मनसेचे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा क्षेत्र) श्री.किशोर भाऊ मडगुलवार यांच्या पुढाकाराने मनसेच्या महिला सेना बल्लारपूर तालूका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार यांनी नगराध्यक्ष साहेबांची भेट घेऊन निवेदना मार्फत समस्या निर्दशनास आणुन देत आपण योग्य ती चौकशी करून ७ दिवसाचे आत या समस्येचे निराकारन करावे अन्यथा मनसे शैलीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला निवेदन देतांना मनसेचे जिल्हाअध्यक्ष दिलीपभाऊ रामीडवार,मनविसे जिल्हाअध्यक्ष राहुल बालमवार,मनसेचे जिल्हासचिव श्री.किशोरभाऊ मडगुलवार,मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेळे,चंद्रपुर तालुका अध्यक्ष विवेक धोटे,बल्लारपूर तालुका अध्यक्ष महिला सेना कल्पनाताई पोर्तलावार,बल्लारपूर शहरअध्यक्ष प्रविण दासारपू,मनसेचे रुग्ण मित्र प्रविण शेवते,क्रिष्णा पोर्तलावार आदी मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.