
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी
आष्टी – कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमी च्या पत्यावर पत्र पाठवून आज महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पोस्टकार्ड द्वारा बिरसा आंबेडकर फुले शिवाजी सोशल असोसिएशन आष्टी (बापसा) कडून अभिवादन करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी ही संकल्पना समोर आणली होती, त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी पत्र पाठवून सर्वांनी घरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहन केले होते. आष्टी येथील बापसा असोसिएशन चे पदाधिकारी संघशिल बावणे, साहिल साखरकर, स्वप्नील धुरके, अनिकेत तावडे यांनी पुढाकार घेऊन बहुसंख्येने पत्र पाठवली.
