प्रभारी ठाणेदार बिराजदार यांचा महिलावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला त्यांना जेरबंद करा:आमदार धर्मरावबाबा आत्राम

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी

आष्टी येथील प्रभारी ठाणेदार सखाराम बिराजदार यांनी सोमवार 22 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आदिवासी महिला सोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्राप्त झाली असून प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आष्टी येथे प्रभारी ठाणेदार बिराजदार यांना जेरबंद करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची तीव्र मागणी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे.

एका कौटुंबिक विवाद प्रकरणासंदर्भात चौकशी चव्हाण यांनी सोमवारी पीडित महिलेचे घर गाठून बिराजदार यांनी त्या महिला सोबत कुकर्म करण्याचे प्रयत्न केल्याने प्रकरण गंभीर असून तात्काळ बिराजदार यांना जेरबंद करण्याची व कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी करून असले घाणेरडे प्रकार यापुढे कदापि खपवून घेणार नाही असा सज्जड इशाराही दिले आहे.

मागावी असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.महाराष्ट्र राज्य गृह विभाग आवार सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असताना यासारखे प्रकार होत आहेत.त्यामुळे आता अशी पोलिसांची कार्यप्रणाली बाबतीत शासन कोणती भूमिका पार पाडली याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.