
प्रतिनिधी:रजत रोहनकर,आष्टी
किसनराव खोब्रागडे महाविद्यालय मध्ये गडचिरोली ज़िल्हा उच्च शिक्षित प्राध्यापक संघटनेची आढावा बैठक संघटनेचे अध्यक्ष अविनाश भूरसे यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आली.
या सभेत 100% सहाय्यक प्राध्यापक पदभरती करणे ,1/10/2017 च्या ऐवजी 1/10/2020 च्या आकृती बंदानुसार पद निर्माण करणे आणि 100 पॉईंट बिंदूनुसार रोस्टर तयार करणे तसेच गडचिरोली ज़िल्हा उच्च शिक्षित प्राध्यापक संघटनेची नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली, यामध्ये
अध्यक्ष पदी अविनाश भुरसे,
उपाध्यक्ष देवानंद गोरडवार
सचिव मंगेश रणदिवे
कोषध्यक्ष सागर कामडी यांची एकमताने निवड करण्यात आली
या सभेला गीता भैसारे , सुबोध साखरे, निशिकांत बुल्ले, अतुल बारसागडे , स्वप्नील मलोडे ,अंबरीश उराडे,ताकसांडे, अंबाडे, स्वप्नील धुरके, आभारे ,पराग टेम्भूर्णे,महेश सीलमवार सर आदी उपस्तित होते.
