मागील तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत – भारतीय विद्यार्थी मोर्चा यांची मुख्यमंत्री कडे तक्रार

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी

आज शुक्रवारी भारतीय विद्यार्थी मोर्चा अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी महाराष्ट्रातील तालुक्यात निवेदन देण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले विद्यार्थी यांच्या परीक्षा मागील दोन ते तीन वर्षां पासून नाही झाल्याची ची तक्रार भारतीय विद्यार्थी मोर्चा ला स्पर्धा परीक्षार्थींच्या माध्यमातून आली होती.
त्या निवेदनावर कारवाई करत भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या माध्यमातून निवेदन देण्याचा कार्यक्रम राबविन्यात आला. यात भारतीय विद्यार्थी मोर्चा युनिट मुलचेराचे अध्यक्ष सिद्धार्थ वाळके यांच्या नेतृत्वात मा. तहसीलदार मुलचेरा यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी हेमा डोर्लिकर, सानिका मेश्राम, श्रेया मेश्राम, निकिता बारसगडे, अपेक्षा दुर्गे आदी पदाधिकारी उपस्थित होते.