आष्टी येथे मोर्चा काढून युवक व सर्व पक्षीय नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी:रजत रोहनकर,आष्टी

नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी आज मंगळवार 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली होती. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थी मोर्चा ने शेतकऱ्यांमधे जनजागृती करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 13वा दिवस आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देत भारतीय विद्यार्थी मोर्चाचे अध्यक्ष संघशिल बावणे, उपाध्यक्ष साहिल साखरकर, महासचिव सप्नील धुरके सर व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जिल्हाध्यक्ष हरीश मंगाम, एम एन स्टेट कॉर्डिनेटर आनंद कोरडे, अखिल निमगडे, अनिकेत तावडे, आयुष मुरार, नागेश वाट आणि इतर युवकांनी शेतकऱ्याला समर्थन दिलं.