
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी
महापुरुष जिवन संदेश अभीयान अंतर्गत बुधवार दि.१४ एप्रिल २०२१ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्याने “बिरसा-आंबेडकर-फुले-शिवाजी सोशल असोसिएशन- आष्टी” (BAPSSA)कडून २००० ग्रंथांचे मोफत वितरण आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात, तसेच मुलचेरा या ठिकाणी करण्यात आले.
या उपक्रमाला बुद्धिजीवी, कर्मचारी, व्यापारी वर्गाने सहकार्य केले, तसेच उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी पवन कुकुडकर, साहिल साखरकर, शुभम तावाडे, अनिकेत तावाडे, चैतन्य मेश्राम, स्वप्नील धुरके(सर), अखिल निमगडे, अमित नगराळे, संघशील बावणे, अमित कुंभारे, आयुष ठवरे, आशय शेरेकर, सचिन खोब्रागडे, रामजी निमगडे, अमित खोब्रागडे, चेतन गोगुला, सिध्दार्थ वाळके, आनंद कोरडे, प्रशिक डोंगरे, धम्मदीप देठे, प्रशिक अलोने यांनी सहकार्य केले.
