होळी, धुलीवंदन साधेपणाने साजरा करा – जिल्हाधिकारी, दीपक सिंगला

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी

जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी होळी, धुलीवंदन कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
आज जिल्हयात 69 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10397 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9862 वर पोहचली. सद्या 426 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.