जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक पकडला

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी

आष्टी – रायपूर वरून हैदराबाद ला आष्टी – अल्लापल्ली मार्गाद्वारे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी बुधवारी सकाळी बारा वाजताच्या सुमारास येथील महात्मा फुले महाविद्यालय जवळ पकडला. या ट्रक मधील 28 पाळीव जनावरांची कसायाच्या तावडीतून सुटका केली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सर्व 28 जनावरांना मार्कंडा येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले. ही कारवाई प्रभारी ठाणेदार सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय गोंगले, पोलीस शिपाई राजू पंचफुलिवार यांनी केली.