चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नदीत कोसळली

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी

आष्टी – आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास तेंदूपत्ता घेऊन येणारे ट्रक वाहन क्रमांक MH 34 BG 6111 ट्रक चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पुलावरून खाली कोसळली ह्यात दोन इसमाचा जागीच मृत्यू झाला असून एक जखमी झालेला आहे.

हरमन ट्रान्सपोर्ट बल्लारपूर यांच्या मालकीचे हे ट्रक आहे. आष्टी पोलीस स्टेशन येथील पी.एस.आय वैशाली कांबळे यांच्या तत्परतेने जखमी इसमाला प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुमरसिंह राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करत आहेत.