गडचिरोलीत नक्सल वाद्यांसोबत मोठी चकमक,13 नक्सल्यांचा खातमा

संग्रहित

सहसंपादक:प्रशांत बदकी

गडचिरोली – राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी, 8 जणांचे मृतदेह जंगलातून ताब्यात घेण्यात आले आहेत.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलवाद्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत शुक्रवारी सकाळी तब्बल 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे.
एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर हल्ला

नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला केला होता. या ग्रॅनाईटचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जात आहे. पोलीस स्टेशन पर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागणार आहे. त्यात, पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.