आष्टी पोलिस द्वारे १८ हजार ५०० रुपयाची दारू जप्त,नदीपात्रातुन होणारी तस्करी रोखली

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी

वैनगंगा नदी पात्रातून अवैध दारू तस्करी होत आहे असे कळविण्यात आले त्यानुसार आष्टी पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र मडावी , सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले,पोशी ढेंगळे, चौधरी व दोन पंचासमक्ष कुनघाडा (माल) नदीपात्र गाठले असता एक इसम नदीपात्रातील रस्त्यावरुन एक प्लास्टीक ची पिशवी घेऊन येत होता. त्याला कवेत घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील पिशवी मध्ये विदेशी दारूच्या १२५ बॉटल आढळले आहेत.अठरा हजार पाचशे रुपये किमतीचा माल आष्टी पोलिसांनी द्वारे जप्त करण्यात आलेला आहे.
सदर अवैध विदेशी दारू अवैध विक्री करण्यास तस्करी करीत आहे असे दिसून आल्याने आरोपी गणेश मुतेवार वय ३० रा.कुनघाडा (माल) यांचे विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन येथे मुदाका ६५(ड) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले व कर्मचारी करीत आहेत.