

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी
आष्टी – ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. शिवसेना जिल्हा उपप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी येथे आष्टी शहर विकास आघाडीचे १३ उमेदवार विजयी ठरले.
ग्रामपंचायत निवडणुकीत १५ पैकी १३ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने मोठा विजय मिळवला आहे. शिवसेना जिल्हा उपप्रमुख राकेश बेलसरे यांचे आष्टी मतदारसंघात पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व सिद्ध झालं. राकेश बेलसरे, रेश्मा फुलझेले, विनोद (छोटू) दुर्गे, यांच्या सह १० उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
