
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
वरोरा तालुक्यात सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर मोठे संकट आले पाठोपाठ कापुस पिकावर सुध्दा बोंडअळी आणी बोंडसळ या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला येऊन खुप मोठ्या संकटात आला आहे शेतकऱ्यांचे जिवन जगणे कठीण झाले आहे पुढे परिवाराचा उदरनिर्वाह करायचा कसा पोरांचे समोरचे शिक्षण करायचे कसे अश्या अनेक गंभीर समस्या शेतकऱ्यांनासमोर निर्माण झाल्या आहे या सर्व समस्यांची जाणीव ठेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
कृषीपंपाला मोफत आणी उच्च दाबाचा दिवसा विज पुरवठा देन्यात यावा
अश्या विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या नेतृत्वाखालील तहशीलदार साहेब यांना निवेदन देन्यात आले निवेदन देतेवेळी तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे , गणपत भडगरे, रोशन भोयर, विनोद कोठारे, विजय कुडे, पंकज मांडवकर , ऋषिकेश कुडे, ऋषिकेश पाटील, संकेत वानखेडे आणि शेतकरी उपस्थित होते
