

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी
आष्टी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्पर्धा परीक्षा वाचनालयाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. या वाचनालयात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा साठी तसेच इतर शाळेतील विद्यार्थी अभ्यासाकरता येतात. या वाचनालयात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. पण लॉक डाऊन पासून मात्र या वाचनालयाकडे दुर्लक्ष होत आहे.
वाचनालयाच्या सभोवती कचऱ्याची वाढ झाल्याने विद्यार्थिनींना मुत्री घराकडे ये जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांकरीता मुत्रीघराची सोय नसल्यामुळे उघड्यावर मुत्रविसर्जन केल्यामुळे वाचनालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. वाचनालयातील एक खिडकी तुटल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरील आवाजामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटना आष्टी चे अध्यक्ष संघशिल बावणे, कार्याध्यक्ष अमित नगराळे, उपाध्यक्ष साहिल साखरकर, महासचिव सप्नील धुरके, पवन कुकुडकर, शुभम तावाडे, अमित कुंभारे सदस्यांनी आष्टी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक इंद्रावनजी बारसागडे यांच्याकडे या काही विषयाची व माहितीची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
